उल्हासनगरातील बहुतांश रस्ते खड्यांतच!

 सेप्टेंबर : उल्हासनगरमधील रस्त्यांच्या खड्यांची समस्या दूर करण्यासाठी खड्यांमध्ये खडी टाकण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. मात्र, ठेकेदारांनी खडी टाकल्यानंतर रोलर फिरवला नव्हता. यामळे सर्व खडी रस्त्यावर पसरली गेली आणि रस्ते जास्तच धोकादाय झाले. याबाबत मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी रोलर फिरण्याचे आदेश ठेकेदारांना दिले. मात्र, पावसामुळे खड्यांमधील खडी वाहून गेल्याने पुन्हा त्यांचे साम्राज्य पसरले आहे. उल् ह । र । - [ र [ र महानगरपालिकेने शहरातील खड्डे तात्पुरते बुजवण्यासाठी २४ लाख रुपयांचा कंत्राट चार विविध ठेकेदारांना दिला आहे. या ठेकेदारांनी खड्यांमध्ये खडी टकून काम आटोपण्याचा प्रयत्न केला. खडी टाकल्यानंतर त्यावर रोलिंग करणे न केल्याने खडी रस्त्यावर पसरली व रस्ते धोकादय झाले. या परिस्थितीत दुचाकी वाहने घसरुन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.