ठाण्यात शिंदे-फडणवीस यांनी एकमेकांवर उधळली स्तुतिसुमने

सेप्टैंबर :ठाणे शहराच्या धर्तीवर राज्यभर बांधीव विकास हस्तांतरण हक्क प्रदान करत पोलिस ठाण्याच्या सुसज्ज इमारती उभारण्यात येतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. पोलिस कर्मचा-यांच्या वसाहतींची उभारणी करातानाही हीच पध्दत अनुसरली जाईल. ठाण्यातील वर्तकनगर तसेच अन्य भागातील पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने प्रयत्न केले जातील. ठाण्याच्या विकासासाठी यापूर्वीही सरकार सकारात्मक राहिले आहे आणि पुढेही विकास प्रस्तावांविषयी तातडीने निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले.